साताऱ्यात शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा वेटिंगवर

लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या मंगळवारी ७ मे रोजी मतदान होणार असल्याने रविवारी ५ रोजी प्रचाराच्या तोफा थंड पडणार असल्याने प्रचाराला केवळ तीनच दिवस उरले आहेत.
साताऱ्यात शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा वेटिंगवर

कराड : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या मंगळवारी ७ मे रोजी मतदान होणार असल्याने रवि. ५ रोजी प्रचाराच्या तोफा थंड पडणार असल्याने प्रचाराला केवळ तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांतील महायुतीतील भाजपचे उदयनराजे भोसले व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा प्रचार हातघाईवर आला आहे.

सातारा मतदारसंघाचा पसारा मोठा असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील कार्यकतें कामाला लागले आहेत. भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कराड येथे झाली. या सभेमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ उठवण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहे. अंतिम टप्प्यात शरद पवार हे सातारा येथे शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत तर उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेण्याच्या हालचाली भाजपतर्फे सुरू आहेत. तीन दिवसांतील शेवटच्या टप्प्यातही महत्वाच्या नेत्यांच्या सभांबरोबर कोपरा बैठका आणि प्रत्यक्ष भेटीगाठींवर उमेदवार भर देत आहेत.

त्यासाठी रात्रंदिवस उमेदवारांचा प्रचार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.प्रत्येक ठिकाणी पोहोचणे शक्य होणार नसल्याने विधानसभा मतदारसंघ निहाय नेते व पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

घरोघरी पत्रके जाऊन देणार

महिला आघाडीही सक्रीय झाली आहे. प्रचाराला केवळ तीन दिवस उरल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही उमेदवार प्रयत्न करत आहेत. दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्तेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. उमेदवारांची प्रचार पत्रके घरोघरी जाऊन देण्यावर दोन्ही आघाड्यांनी भर दिला आहे तर प्रशासनाच्या वतीने बीएलओ मार्फत घरोघरी वोटर स्लीप दिल्या जात आहेत. प्रशासकीय यंत्रणेनेही मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. येत्या मंगळवारी ७ रोजी मतदान होणार असून येत्या ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in