"श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप...", प्रियांका चतुर्वेदींची विखारी टीका

"गद्दार गद्दारच राहणार. एक सिनेमा आला होता, तुमच्या लक्षात असेल 'दिवार' नावाचा सिनेमा होता. या सिनेमात अमिताभ बच्चन आपला हात दाखवतात, त्या हातावर 'मेरा बाप चोर हैं' असे लिहिले असते. तसंच वाक्य...
"श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप...", प्रियांका चतुर्वेदींची विखारी टीका

मुंबई : "श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर 'मेरा बाप गद्दार है' लिहिले आहे", असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केले आहे. उत्तर पूर्व-मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून संजय दिना पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये बुधवारी (९ मे) महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर प्रियांका चतुर्वेदी यांनी काळ्या पैशावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल केला.

नेमक्या काय म्हणाल्या प्रियांका चतुर्वेदी?

"गद्दार गद्दारच राहणार. एक सिनेमा आला होता, तुमच्या लक्षात असेल 'दिवार' नावाचा सिनेमा होता. या सिनेमात अमिताभ बच्चन आपला हात दाखवतात, त्या हातावर 'मेरा बाप चोर हैं' असे लिहिले असते. तसंच वाक्य श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिले आहे की, 'मेरा बाप गद्दार हैं", असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. सध्या प्रियांका चतुर्वेदींचे हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाषणादरम्यान प्रियांका यांनी ‘एकनाथ शिंदे गद्दार हैं’ अशा घोषणाही दिल्या. शिवाय, आपल्या या घोषणा ठाण्यापर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असेही त्या उपस्थितांना उद्देशून म्हणाल्या.

अदानी आणि अंबानींवर ईडी कारवाई का नाही?

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, "सर्वात पहिले तर, मोदीजींना विचारा की, ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये तुम्ही नोटाबंदी केली होती. काळा पैसा संपवणार, तुमच्या घरी १५ लाख जमा करणार, असे नोटबंदी करतेवेळी सांगितले होते. आज अदानी आणि अंबानीने तोच काळा पैसा काँग्रेसला दिल्याचे तुम्ही म्हणता. जर, अदानी आणि अंबानीने पैसे दिले तर, तुम्ही त्यांच्या घरी ईडी आणि सीबीआयला का पाठवत नाही? विरोधकांसोबत ईडी आणि सीबीआयचा वापर का करत आहात? असा सवालही प्रियांका चतुर्वेदी यांनी केला पंतप्रधान मोदींना केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in