व्यावसायिक वाहनावरील संदेश मराठी भाषेत; गुढीपाडव्यापासून अंमलबजावणी

येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे. या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
व्यावसायिक वाहनावरील संदेश मराठी भाषेत; गुढीपाडव्यापासून अंमलबजावणी
एक्स Pratap Saranaik
Published on

मुंबई : येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे. या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.

महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. तथापि, राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहिलेले असतात. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारवर बंधने येतात. यापुढे असे सामाजिक संदेश, जाहिरात व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास राज्यातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल, असे सरनाईक यांनी सांगितले.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर व्यावसायिक वाहनांवरील प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहीण्याची अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in