कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

या भूकंपाची खोली नऊ किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना भूकंप मापन केंद्रावरून देण्यात आली
कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

कराड : पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात रवि. २८ रोजी संध्याकाळी ५ वाजून ०६ मिनिटांनी ३.१ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १६ किलोमीटर अंतरावरील कोयना खोऱ्यात हेळवाक गावचे नैऋत्येस सहा किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाची खोली नऊ किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना भूकंप मापन केंद्रावरून देण्यात आली. या भूकंपाची तीव्रता अत्यंत कमी असल्याने याची कोयना धरणाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून, धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. तसेच भूकंप क्षेत्रात कोठेही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in