कोयनानगर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

कोयनानगर परिसरात कोठेही जीवित व वित्त हानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.
कोयनानगर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

कराड : पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात शनिवारी रात्री ९.०४ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता केवळ २.९ रिश्चर स्केल इतकी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू व खोली याबाबची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. धक्का अत्यंत सौम्य असल्याने कोयनानगर परिसरात कोठेही जीवित व वित्त हानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in