सांगलीत कार्यकर्त्यांकडून भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक ; म्हणाले, "गुरुजींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे"

काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक भिडे यांच्यावर चिखफेक करण्यात येत असल्याचंही कार्यकर्ते म्हणाले.
सांगलीत कार्यकर्त्यांकडून भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक ; म्हणाले, "गुरुजींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे"

संभाजी भिडे यांनी अमरावती येथील कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विधिमंडळात देखील त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर राज्यभर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भिडेंच्याअटकेची तसंच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर अमरावतीत गुन्हा देखील दाखल करण्यात आला.

यानंतर याता शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घातला आहे. सांगलीतील रविरावारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिष्ठाणचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पतुळ्याला दुधाने अभिषेक घातला. यावेळी गुरुजींवार महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत असला तरी त्यांनी मुळ चित्रफीत पाहुन खात्री करावी. काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक भिडे यांच्यावर चिखफेक करण्यात येत आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी आम्ही कायदेशीर लढाई लढू. पण जाणीवपूर्वक होणारा गुरुजींचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी दिला. भिडे गुरुजींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असल्याची ग्वाही देखील उपस्थित कारकर्त्यांनी दिली.

रविवारी सकाळी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जमाव जमला, त्यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला. यानंतर भिडे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला.

दरम्यान, भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांकडून सोमवार रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात निदर्शने देखील करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in