
छत्रपती संभाजीनगर : जन्मल्यानंतर कमी वजनाच्या बाळांना तसेच प्रसूतीनंतर ज्या महिलांना दूध कमी आहे, त्यांच्या बाळासाठी आता आईचे दूध मिळणार आहे. घाटी रुग्णालयात ५० लाख रुपये खर्चून मराठवाड्यातील पहिली मिल्क बँक तयार करण्यात आली आहे. त्यासाठी रोटरी क्लबने निधी दिला. देशात सध्या १२० मिल्क बँक आहेत. घाटीतील ही मिल्क बँक दररोज वीस बालकांसाठी आधार ठरणार आहे.
घाटीची मिल्क बँक (अमृतधारा) म्हणजेच मानवी दुग्धपेढीचे लोकार्पण सोमवारी नवजात शिशू अतिदक्षता विभागात करण्यात आले. या वेळी रोटरीच्या प्रांतपाल स्वाती हेरकल, प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रसाद देशपांडे, माजी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, रोटरीचे अध्यक्ष हबीब शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर, डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे, मेट्रन संजीवनी गायकवाड आणि हेमंत लांडगे उपस्थित होते.
मिल्क बँक उभारण्यासाठी ५८ हजार डॉलर एवढा खर्च आला. ही रक्कम रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद पश्चिमच्या सदस्यांनी उभी केली. दहा हजार डॉलर रोटरी क्लब कॅलगरी, कॅनडाने दिले. दोन हजार डॉलर रोटरी क्लब जेम्स रिव्हर रिचमंड, अमेरिका यांनी दिले. तर स्थानिक उद्योजकांमध्ये पगारिया ऑटो प्रा. लि. चे संचालक राहुल पगारिया, अरिहंत होंडाचे संचालक राहुल मिश्रीकोटकर त्यांनी याचे फायदे सांगितले.
यांनीही मदत केली. घाटीच्या नवजात शिशू तीन महिने साठवता येणार दूध : आईचे दूध प्रक्रिया अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. करून ते साठवून ठेवले जाईल. साधारण तीन महिने हे दूध देशमुख यांनी अमेरिकेतून या कार्यक्रमात चांगले राहील. एका वेळी साधारण ९ लिटर दूध या ठिकाणी सहभाग नोंदवला. देशात केवळ १२० आणि उपलब्ध होणार आहे. घाटीत दररोज ९० ते शंभर प्रसूती होतात. राज्यात २५ मिल्क बँक असल्याचे सांगत त्यामुळे आईच्या दुधाच्या उपलब्धतेसाठी अडचण होणार नाही. या बालकांना घाटीने हे दूध मोफत उपलब्ध करून दिले आहे.
दरवर्षी साडेतीन हजार बालके दाखल
डॉ. अमोल जोशी यांची माहिती दिली की, घाटीत दरवर्षी वीस हजार प्रसूती होतात. नवजात शिशू विभागात साडेतीन हजार बालके दाखल होतात. कमी वजनाच्या किमान वीस बाळांसाठी दररोज या दुधाचा फायदा होणार आहे. कमी वजनाच्या बाळासाठी आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असते. दूध पुरवले जाईल. रोटरी फाउंडेशनच्या ग्लोबल ग्रांट प्रकल्पा अंतर्गत रोटरी क्लब औरंगाबाद पश्चिम व व रोटरी क्लब कॅल्गरी, कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने 'अमृत धारा' या मानवी दुग्धपेढीचे लोकार्पण आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील नवजात शिशु अतिदक्षता विभागात करण्यात आले.