औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात एमआयएम आणि इतर काही संघटनांच्या वतीने मंगळवारी शहरातील भडकलगेट ते आमखास मैदानापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हा नामकरणाविरोधी कृती समितीचाही या मोर्चात सहभाग आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला.
‘ज्या औरंगजेबाने हिंदूंचे मंदिरे तोडली, धर्मवीर संभाजी महाराज यांचे हाल करून वध केला. आशा औरंगजेबाचे नाव शहराला कशासाठी? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणारा एमआयएमचा आम्ही निषेध करतो. खासदार इम्तियाज जलील ही राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हा विरोध करत आहेत.’ असा आरोप अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरासाठी मतदान घेण्यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाली की, खासदार जलील हे काय पंतप्रधान किंवा राष्ट्रपती आहे का? की त्यांनी मागणी केली म्हणून ती पूर्ण करावी. असा टोलाही आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांना लगावला आहे.