मंत्री भुजबळांनी टाळली मनोज जरांगे-पाटलांची भेट; जरांगे म्हणाले...

मंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्रावरून तीव्र नाराजी वक्त केली आहे.
मंत्री भुजबळांनी टाळली मनोज जरांगे-पाटलांची भेट; जरांगे म्हणाले...

मनोज जरांगे-पाटील यांनीनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २ महिण्याची मुदत दिली आहे. सरकारने मुदत मागितल्यानंतर उपोषण मागं घेतलं आहे. दुसरीकडे सरकारनं राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटण्यास सुरुवात केली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच ओबीसी समाजाचे नेते आक्रमक होत आहेत. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्रावरून तीव्र नाराजी वक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात त्यांनी त्यांची भूमिका स्प्ष्ट केली आहे. मनोज जरांगेनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळांना भेटण्याच्या माझा काही संबंध नाही. मी आज काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही कि मी कधी काय बोलणार नाही. आरक्षणावर कोण काय बोलत असेल तर त्याला मी सोडणार नाही. अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे-पाटील यांनी दिली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ

आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा कोणताही कार्यक्रम नाही. तर आरक्षण हे समानता निर्माण करण्यासाठी दिलं गेलं आहे. गेली ७० वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळालं असून अजूनही समाज मागासच आहे. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण सरसकट ओबीसीमधून देण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, असं मत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी वक्त केलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in