सुनील शेट्टीच्या वक्तव्याचा मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून निषेध ; कुरिअरने पाठवले ५ किलो टोमॅटो

सुनील शेट्टी याने एका मुलाखतीत टोमॅटोच्या वाढलेल्यादराचा परिणाम माझ्यावरही झाल्याचं म्हटलं होतं
सुनील शेट्टीच्या वक्तव्याचा मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून निषेध ; कुरिअरने पाठवले ५ किलो टोमॅटो
Hp

देशात टोमॅटोचे दर वाढले आहेत. यावर अनेक जोक, मीम व्हायरल होतं आहेत. तसंच अनेकांनी यामुळे सर्वसामान्यांना फटका बसल्याचं म्हटलं आहे. राखी सावंत सुनील शेट्टी यांच्यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील यावर भाष्य देखील केलं आहे. अनेकदा या विषयावर भाष्य करताना हे सेलिब्रिटी वादात देखील सापडले आहेत. असाच काहीसा प्रकार अभिनेता सुनील शेट्टी यांच्या सोबत घडला आहे. सुनील शेट्टी यांनी एका मुलाखतीत टोमॅटोच्या वाढलेल्यादराचा परिणाम माझ्यावरही झाल्याचं म्हटलं होतं. यामुळे त्याने टोमॅटो खाण्याचं बंद केलं होतं. तो म्हणाला की, तुम्हाला वाटत असेल मी सूपरस्टार आहे, मला या महागाईमुळे काही फरक पडत नसले, पण हे खोट आहे. आमच्यावरही महागाईचा परिणाम होतो. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याला अनेकांना चांगलंच धारेवर धरलं होतं.

त्याच्या या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात देखील केला गेला आहे. परळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने भाजीपाला मार्केटमध्ये रविवार(१६ जुलै) रोजी प्रतिकात्म आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अभिनेता सुनील शेट्टी याला ५ किलो टोमॅटो कुरिअरने पाठवण्यात आले.

कृषीमंत्र्यांचा सुनील शेट्टीला टोला

दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर बोलताना टोमॅटो दर वाढले म्हणून काहींनी आंदोलन केल्याचं सांगितलं. जर एखाद्या शेतकऱ्याला टोमॅटोचे जास्त पैसे मिळाले तर चांगलं आहे. त्याबाबतील राजकारण व्हायला नको, असं म्हटलं होतं. तसंच यावेली एक महिना टोमॅटो खाल्ले नाही तर प्रोटीन कमी होणार नाही, असा टोला देखील मुंडे यांनी सुनील शेट्टी याला लगावला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in