मंत्री धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह;  घरीच केले क्वारंटाईन

धनंजय मुंडे यांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती.
मंत्री धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह;  घरीच केले क्वारंटाईन

कोरोनाचा JN. 1 व्हेरियंट वेगाने पसरताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंडे यांचा दोन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहे. धनंजय मुंडे यांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती.

कोरोना विषाणू अद्याप संपलेला नाही. मागील महिन्याभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या अहवालानुसार, गेल्या एक महिन्यात जगभरात कोरोनाचे आठ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर या काळात तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील महिण्याच्या तुलनेने ही वाढ ५० टक्के एवढी आहे.

 WHO  च्या रिपोर्टनुसार, JN.1 या कोरोना व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये या महिन्यात २६ टक्के वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये असणारे लक्षण हे सौम्य असले तरी रुग्णसंख्या वाढीचा वेग बघता सर्व देशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

भारतात देखील रुग्णसंख्या वाढली

भारतात देखील मागील 15 दिवसात कोरोना रुग्णांची सख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या भारतात 3742 एवढे सक्रिय रुग्ण आहेत. यात JN.1 या नव्या व्हेरियंटचे देखील रुग्ण आहेत. मात्र, हा व्हेरियंट धोकादायक नसल्याने घाबरण्याचे कारण नाही. पण, काळजी घेण्यास सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in