चिखलात अडकले मंत्री गिरीश महाजन, Video सोशल मीडियावर व्हायरल

राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन हे राज्याचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांच्याच जामनेर मतदारसंघातील अनेक खेड्यातील रस्त्यांचे संकट त्यांना दूर करता आले नाही आणि हे रस्ते कसे आहेत याचे दर्शन त्यांना मोटारसायकलवरून जाताना दिसून आले.
चिखलात अडकले मंत्री गिरीश महाजन, Video सोशल मीडियावर व्हायरल
X
Published on

जळगाव : राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन हे राज्याचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांच्याच जामनेर मतदारसंघातील अनेक खेड्यातील रस्त्यांचे संकट त्यांना दूर करता आले नाही आणि हे रस्ते कसे आहेत याचे दर्शन त्यांना मोटारसायकलवरून जाताना दिसून आले. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून जामनेर तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा यातून दिसून येते.

जामनेर तालुक्यात लिहा तांडा येथे एका भंडाऱ्यासाठी गिरीश महाजन जात असताना त्यांना मोटारीने जाणे शक्यच नव्हते. तेव्हा मोटारसायकलवरून जात असताना रस्त्यात असलेल्या प्रचंड चिखलामुळे त्यांची गाडी स्लिप झाल्याचे दिसून येत आहे. अशा अवस्थेत ते त्या चिखलातून वाट काढून जात असल्याचे देखील व्हिडीओतून दिसून येत आहे.

गिरीश महाजन आलेले पाहून गावातील तरुणांनी त्यांना हाका मारायला सुरुवात केली आणि त्यांच्या मागे धावत गेले. पण गिरीश महाजन निघून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना घेरले आणि रस्त्याबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. राज्याचे प्रश्न सोडवताना आपल्याच मतदारसंघातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे प्रश्न गिरीश महाजन मात्र सोडवू शकलेले नाही. हे विदारक सत्य या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलेले दिसत असून हा व्हिडीओ राज्यभर मोठ्या प्रमाणात सर्वत्र पाहिला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in