मंत्री गोगावले यांच्या OSD नियुक्तीवरून वाद; नियुक्ती नियमानुसारच - OSD महेंद्र शिर्के

जिल्हा परिषद शिक्षकांना शालेय वर्गातून काढून रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केल्याप्रकरणी वाद निर्माण झाला होता. मात्र, ही नियुक्ती रितसर असल्याचे मंत्री गोगावले यांचे ओएसडी महेंद्र शिर्के यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले.
रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले (संग्रहित छायाचित्र)
रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले (संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : जिल्हा परिषद शिक्षकांना शालेय वर्गातून काढून रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केल्याप्रकरणी वाद निर्माण झाला होता. मात्र, ही नियुक्ती रितसर असल्याचे मंत्री गोगावले यांचे ओएसडी महेंद्र शिर्के यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले.

महाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक डॉ. महेंद्र शिर्के यांची मंत्री गोगावले यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली. शिर्के १६ डिसेंबर २०२४ पासून कार्यरत आहेत. गोगावले यांनी शिर्के यांची मंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्त करण्यास परवानगी द्यावी, असे पत्र ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांना लिहिले. ग्रामीण विकास विभागाच्या नियमांनुसार शिक्षकांना मंत्री कार्यालयात नेमण्यास परवानगी नाही. तरीही गोगावले यांनी शिफारस पत्र दिल्याने या नियुक्तीला ग्रामीण विकास विभागाने आक्षेप नोंदवला. त्यामुळे या दोन्ही नियुक्तीवरून वाद निर्माण झाला होता. मंत्री गोगावले यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अधिकारी नियुक्ती केली जात आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in