मंत्री हसन मुश्रीफांचा खासगी रुग्णालयांवर गंभीर आरोप ; नांदेड येथील बालकांच्या मृत्यूला धरलं जबाबदार

मंत्री हसन मुश्रीफांचा खासगी रुग्णालयांवर गंभीर आरोप ; नांदेड येथील बालकांच्या मृत्यूला धरलं जबाबदार

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
Published on

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर देखील या रुग्णालयात रुग्ण दगावण्याचं सत्र सुरुच होतं. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाडी रुग्णालयात १८ रुग्ण दगावले होते. तर नागपूरमध्ये देखील हा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे राज्यभर संतापाची लाट परसली होती. आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर प्रतिक्रिया देत या घटनेला खासगी रुग्णालये जबाबदारी असल्याचं सांगितलं आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. तसंच काही कठोर निर्णय देखली याप्रकरणी घेतले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारी रुग्णांलयातील अस्वच्छता आणि डॉक्टरंच्या बदल्यांबाबत सरकार पावलं उचलणार असल्याचं देखली हसन मुश्रीफ म्हणाले.

डॉक्टरांच्या बदल्यांचं प्रकरण देखील चर्चेत असून असून याबाबत देखील सरकार पावलं उचलणार आहे. तसंच नांदेड दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर उद्या राजय सरकारकडून उत्तर दाखल करण्यात येणार आहे.

बालकांच्या मृत्यूला खासगी रुग्णालये जबाबदार

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू नेमके कशामुळं झाले याबाबतची माहिती उत्तरात नमूद करण्यात आली आहे. १० लहान मुलांचे मृत्यू झाले त्याला खासगी दवाखाने जबाबदार असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. खासगी दवाखान्यांना ५ दिवस सुट्ट्य असल्याने या रुग्णलयांनी अत्यवस्थ लहान मुलांना सरकारी दवाखान्यात दाखल करायला सांगितल्याचंही मुश्रीफ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in