
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धामिकेचे फोन आले. यामुळं एकाच खळबळ उडाली. यापूर्वीही त्यांना धमकीचे फोन आलेले होते. दरम्यान, आज नागपूर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये दोनदा फोन आले. मिळालेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने हे धमकीचे फोन आले होते. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात नागपूर पोलिसांना माहिती दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी जानेवारीमध्ये जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याच नावाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळीही या व्यक्तीने कार्यालयात तीनदा फोन करत धमकी दिली होती. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासात हे फोन कर्नाटकातील बेळगाव तुरुंगातून करण्यात येत असल्याचे समोर आले होते. पण, आजही याच नावाने फोन आल्याने पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा कमला लागली आहे. त्यामुळे आता या तपासात काय समोर येते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.