पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

गेल्या सहा महिन्यांपूर्वी बज्या माने याने एका अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेल्याने त्याच्याविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे, मात्र तो तेव्हापासून फरार होता. शहर पोलीस या फरार आरोपीचा शोध घेत होते.

कराड : अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या रेकॉर्डवरील संशयित आरोपीस कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेत अटक केले. त्याच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगा करणे, मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा करणे, शांतता भंग करणे यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात आहे. बज्या उर्फ बजरंग सुरेश माने (३०) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी बज्या माने याने एका अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेल्याने त्याच्याविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे, मात्र तो तेव्हापासून फरार होता. शहर पोलीस या फरार आरोपीचा शोध घेत होते.

logo
marathi.freepressjournal.in