बेपत्ता सॉफ्टवेअर इंजिनियरची हत्या

रिसरातच कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे
बेपत्ता सॉफ्टवेअर इंजिनियरची हत्या
Published on

पुणे : हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या सौरभ नंदलाल पाटील (२८ ) याचा पुणे-नाशिक महामार्गावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक अहवालानुसार त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. २८ जुलैपासून तो बेपत्ता होता. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. खेड तालुक्यातील होलेवाडी परिसरात सौरभच्या दुचाकीची चावी विहिरीच्या रेलिंगला उरलेली आढळून आली होती. त्या परिसरातच त्याचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. सौरभ पाटील याच्या हत्येप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in