
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका प्रहार पक्ष एकटा लढणार असल्याची घोषणा कडू यांनी केली आहे. जर शिंदे गट व भारतीय जनता पक्षाने त्यांची मर्जी असेल सोबत घेतले तर ठीक, नाहीतर आम्ही स्वतंत्र लढू असे सांगत बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजी नाराजीचा सूर आळवला आहे.
बच्चू कडू हे आज उस्मानाबाद जिल्ह्यात कोर्टातील एका प्रकरणातील सुनावणीसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हे सांगणे कठीण आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागेल का हे पण सांगणे कठीण आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार होईल असा मला विश्वास आहे. जर नाही झाले तर तरी बच्चू कडू बच्चू कडूच आहे, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.
आज कोर्टात प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बचू कडू यांच्या विरोधात सुरू असलेल्या शासकीय कामात अडथळ आणल्याच्या प्रकरणी उस्मानाबाद न्यायालयाने आमदार कडू यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. आमदार कडू कोर्टात हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने अटक वॉरंटही काढले होते. यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याची तंबी जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली आहे.
१४ जानेवारी २०१९ पासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने कोर्टाने सुनावणीदरम्यान खडे बोलही सुनावले. कडू यांच्यासह अन्य ३ आरोपींना सुद्धा दंड ठोठावण्यात आला. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आंदोलनादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता.