आमदार बच्चू कडू आक्रमक! मंत्रालयात साप सोडण्याचा दिला इशारा

मुख्यमंत्र्यांच्या माध्यामातून आम्ही कृषी सचिवाला इशारा देत आहोत, त्यांनी पंधरा दिवसात या विषयावर तोडगा काढावा. अन्यथा...
आमदार बच्चू कडू आक्रमक! मंत्रालयात साप सोडण्याचा दिला इशारा

प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. कडू यांनी अमरावती येथे एल्गार मोर्चाची हाक दिली. यावेळी त्यांनी मंत्रालयात असलेल्या कृषी कार्यालयातील सचिवांच्या कार्यालयात साप सोडण्याचा इशारा दिला आहे. मजुरांच्या प्रश्नावर पुढील १५ दिवसांत तोडगा काढा,अन्यथा मंत्रालयात साप सोडू, असं विधान बच्चू कडूंनी केलं आहे.

या मोर्चात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी आणि मजुरांच्या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, गावातल्या मजुरांसाठी एकही योजना नाही. शेतकऱ्याला साप चावला तर त्यांच्यासाठी विमा आहे. मात्र, मजुराला साप चावला तर त्याला पैसे मिळत नाही. मुख्यमंत्र्यासोबत याबाबत बैठक घेतल्यावर त्यांनी याबाबत पैस देण्यास होकार दर्सवला. पण मंत्रालयातील कृषी सचिव ढवळे याला आडवा येत आहे, असं कडू म्हणाले.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या माध्यामातून आम्ही कृषी सचिवाला इशारा देत आहोत, त्यांनी पंधरा दिवसात या विषयावर तोडगा काढावा. अन्यथा आम्ही मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडू. सापाला काही जात धर्म नसतो. एका गावातील मजुराताला साप चावला तर पैसे मिळणार आणि दुसऱ्या गावातील मजुराला चावला तर तर पैसै मिळणार नाहीत. हा अन्याय आहे. आम्ही सहन करणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in