आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी उदय सामंतांच्या गाडीची मागची काच फोडल्याचा आरोप आहे.
आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला
Published on

माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना हा हल्ला करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांकडून ‘गद्दार-गद्दार’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात पोहोचला. कात्रजमधील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परत जात होते. नेमक्या त्याचवेळी तानाजी सावंत यांच्या घराकडे निघालेल्या उदय सामंतांची गाडी तिथे पोहोचली. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी उदय सामंतांच्या गाडीची मागची काच फोडल्याचा आरोप आहे. दुसरीकडे हा हल्ला आमच्या शिवसैनिकांनी केला नाही, असे आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

नेमके काय घडले?

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि बंडखोर नेते उदय सामंत काही क्षण एकमेकांसमोर आले. उदय सामंत हडपसरकडून कात्रज-कोंढवा रोडने कात्रज चौकात आले. त्याच वेळी आदित्य ठाकरेंचा ताफा त्याच चौकाकडे येत होता. त्यामुळे शिवसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी चौकात झाली होती. यातील काही शिवसैनिकांनी उदय सामंतांची गाडी ओळखली व गाडीला घेराव घातला. ‘गद्दार...गद्दार’ अशा घोषणा देत उदय सामंत यांच्या गाडीला शिवसैनिकांनी घेराव घातला.

logo
marathi.freepressjournal.in