मराठी पाट्यांवरुन मनसे आक्रमक; दहा दिवसांत मराठी पाट्या केल्या नाहीतर खळखट्याक करण्याचा इशारा

मनसेकडून कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये घुसून मराठी पाट्यांच्या मुद्यावर आंदोलन
मराठी पाट्यांवरुन मनसे आक्रमक; दहा दिवसांत मराठी पाट्या केल्या नाहीतर खळखट्याक करण्याचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह महाराष्ट्रातील दुकानांवर पाट्या मराठी भाषेत कराव्या असा निर्णय दिला. मात्र असं असताना देखील मुंबीतील काही व्यापारी याला जुमानत नसल्याचं समोर आलं आहे. बीएमसीने अशा दुकानदारांवर कारवाई सुरु करुन देखील व्यापारीवर्ग ठळक मराठी भाषेत पाट्या लावताना दिसत नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं(MNS) पुन्हा एकाद खळखट्याक आंदोलन सुरु केलं आहे. मनसैनिकांनी आक्रमक होत कुर्ल्यातील फिनिक्स मॉलवर घडक मारली आणि त्यांना समज दिली. येत्या दहा दिवसात जर या मॉलवर मराठी भाषेत पाट्या दिसल्या नाहीत तर मनसे खळखट्याक स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मनेसेचे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात सोमवारी कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये घुसून मराठी पाट्यांच्या मुद्यावर आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांकडून मनसैनिकांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी मनसैनिक आणि मॉल प्रशासन यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन काही वेळासाठी वातावरण तापलं होतं.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनसैनिकांना समज देऊन सोडून दिलं आहे. मात्र, मनसेने फिनिक्स मॉलला दहा दिवसाची वेळ दिली आहे. अजूनही या मॉलमध्ये मराठी पाट्या लावण्यात आल्या नाहीत. ही त्यांची मुजोरी आहे. दहा दिवसात मराठी पाट्या लावाल्या नाहीतर दगडफेक करु, असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेली २५ नोव्हेंबरची मुदत संपली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून अंधेरी पश्चिमेकडून मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केटमधील दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याचे आदेश दिले. तर ठाण्यात आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी मराठी पाटी नसलेल्या शोरुमला काळं फासलं आहे. जर दुकानाचं नामफलक मराठीत झाले नाही तर मनसे स्टाईल खळखट्याक करण्याचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in