

मुंबई : राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एप्रिल २०२६ मध्ये राज्यभर जिल्हा संपर्क अध्यक्ष पदावर मोठ्या प्रमाणात नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये ठाण्यातील नेत्यांवर विशेष विश्वास दाखवत अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची, तर संदीप पाचंगे यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याने या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
मनसेने ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये एकापेक्षा अधिक संपर्क अध्यक्ष नेमले आहेत. ठाण्यात मनोज चव्हाण आणि संजय नाईक, पालघरमध्ये प्रमोद (राजू) पाटील आणि केतन नाईक, तर रायगडमध्ये संदीप देशपांडे, योगेश परुळेकर आणि राजेश येरुणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यात अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर आणि अमेय खोपकर, तर नाशिकमध्ये अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्गमध्ये शिरीष सावंत आणि संदीप दळवी, रत्नागिरीत नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळा नांदगावकर, विनायक म्हशिलकर, चितलांगे आणि बिपिन नाईक यांची दिलीप नियुक्ती करण्यात आली आहे.
विदर्भ विभागात अमरावती येथे राजू उंबरकर, नागपूरमध्ये हेमंत संभूस, अकोल्यात हेमंत गडकरी, यवतमाळमध्ये प्रशांत कनोजिया आणि बुलढाण्यात बाळा शेडगे यांची निवड करण्यात आली आहे.
मराठवाड्यात लातूरमध्ये दिलीप धोत्रे, जालन्यात जयप्रकाश बाविस्कर, नांदेडमध्ये संतोष नागरगोजे व सतनामसिंग गुलाटी, तर धाराशिवमध्ये राजेंद्र (बाबू) वागसकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. साताऱ्यात गणेश सातपुते व रणजित शिरोळे, कोल्हापुरात यशवंत किल्लेदार व नंदकुमार चिले, धुळ्यात प्रकाश भोईर, नंदुरबारमध्ये कर्णाबाळा दुनबळे, तर जळगावमध्ये संदीप पाचंगे व आशिष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये नयन कदम यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.