"कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवार यांना आज...", राज ठाकरेंनी शरद पवारांवर डागली तोफ

शरद पवार यांनी 'तुतारी' फुंकून आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावर बोलणाऱ्या पवारांवर तोफ डागली आहे.
Raj Thackeray vs Sharad Pawar
Raj Thackeray vs Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या 'तुतारी' चिन्हाचं आज किल्ले रायगडावर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित अनावरण केलं. शरद पवार यांनी 'तुतारी' फुंकून आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावरुन बोलणाऱ्या पवारांवर तोफ डागली आहे. कधीही छत्रपतींचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला. तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर बोलता पण तुम्ही शिवछत्रपतींचं नाव कधी घेत नाहीत. शिवछत्रपतींचं नाव घेतल्याने मुस्लिमांची मते जातात. अशा संभ्रमावस्थेत इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना हे सगळं आठवलं, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांवर केला आहे.

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पत्रकारांनी पवारांच्या तुतारी चिन्हाच्या कार्यक्रमाबाबत प्रश्न विचारले असता, ते म्हणाले, आपल्याकडचे महापरुष आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत. आता सध्याचं राजकारण हे महापुरुषांवरच सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवलं. इकरे वर्ष ते शाहु, फुले, आंबेडकर यांचं नाव का घेत होते, असा थेट सवाल ठाकरे यांनी पवारांना केला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, गणपतराव गायकवाड यांच्यासारखा माणूस टोकाचं पाऊल उचलून असं काही का करेल, गोळीबार करण्याची त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कुणी आणली? याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. न्यायालयात ती चौकशी होईलच.

मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा जे आपण म्हणतोय, पण मराठी भाषेचा अभिमान असणारे राजकारणात किती लोक आहेत. अशा लोकांना काही देणंघेणं नाही. अभिजात भाषेचा दर्जा दिला, असं विचारणारी लोक आहेत आपल्याकडे. राज्यातले पक्षच या प्रकारचा दबाव आणू शकतात आणि अशा गोष्टी होऊ शकतात. लोकांना कुणी ईडी पाठवलीय का, जनतेने या गोष्टी वठणीवर आणल्या पाहिजेत. त्याशिवाय ते होणार नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in