आगामी निवडणुकीपूर्वी मनसे सदस्य नोंदणी राज्यभर अभियान

मनसेच्या नव्या घोषणेमध्ये मराठी अस्मितेसोबत हिंदुत्वाचा मुद्दाही जोडण्यात आल्याने मनसेची भविष्यातील राजकीय भूमिका स्पष्ट
आगामी निवडणुकीपूर्वी मनसे सदस्य नोंदणी राज्यभर अभियान

मराठीसह हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली राज ठाकरेंची मनसे आता 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक'ची घोषणा करणार आहे. निवडणुकीपूर्वी मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला आजपासून पुण्यातून सुरुवात झाली असून आज पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ पार पडला. मनसेच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयातून सकाळी प्रचाराला सुरुवात झाली. मनसेने मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला. आता मनसेच्या नव्या घोषणेमध्ये मराठी अस्मितेसोबत हिंदुत्वाचा मुद्दाही जोडण्यात आल्याने मनसेची भविष्यातील राजकीय भूमिका स्पष्ट झाली आहे.

आगामी निवडणुकीपूर्वी मनसे सदस्य नोंदणी अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. या सदस्य नोंदणी अभियानासाठी मनसेने नवा नारा जाहीर केला आहे. 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक असा मनसेचा नवा नारा असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in