छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ मनसेची रॅली; 'स्वप्नपूर्ती' मोर्चा पोलिसांनी अडवला

छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रॅली काढली पण पोलिसांनी मात्र कारवाई करत घेतले मनसे सैनिकांना घेतले ताब्यात
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ मनसेची रॅली; 'स्वप्नपूर्ती' मोर्चा पोलिसांनी अडवला

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ 'स्वप्नपूर्ती' मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, यावेळी एमआयएमने नामांतराला विरोध करत रॅली काढली होती, त्याचा देखील यावेळी निषेध करण्यात आला. दरम्यान, हा मोर्चा ग्रामदैवत असलेल्या श्री. संस्थान गणपती इथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार होता. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवला.

काही दिवासांपूर्वी राज्य शासनाने औरंगाबाद शहराचे नामांतर करत छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्याचा निर्णय घेतला. याविरोधात एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनातून छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध करण्यात आला. या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी मनसेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले. मात्र पोलिसांच्या वतीने परवानगी नाकारण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in