Raj Thackeray : राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द; परळीत राष्ट्रवादीकडून जोरदार स्वागताने चर्चेला उधाण

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी परळीमधील कोर्टामध्ये हजर राहिल्यानंतर कोर्टाने त्यांचे अटक वॉरंट केले रद्द
Raj Thackeray : राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द; परळीत राष्ट्रवादीकडून जोरदार स्वागताने चर्चेला उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) परळी न्यायालयात हजर झाले. प्रत्यक्ष हजेरी दर्शवल्यानंतर न्यायालयाने त्यांचे अटक वॉरंट रद्द केले. ५०० रुपयांचा दंड भरून त्यांची सुटका झाली. मात्र, राज ठाकरे परळीत दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यासाठी आज राज ठाकरे परळीमध्ये दाखल झाले. राज ठाकरे परळीमध्ये दाखल होताच, त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पांगरी गावचे सरपंच सुशील कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे कार्यकर्त्ये यांनी ५० फुटाचा हार राज ठाकरेंसाठी बनवला होता.

नेमके प्रकरण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ मध्ये एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर राज ठाकरे तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in