...तेव्हा महाराष्ट्रद्रोही असल्याची लाज वाटली नाही का? संजय राऊतांच्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर

"हिंदूंनी महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करा, असा मी 'फतवा' काढतो", असे मनेस अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

'राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी', अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केली. यानंतर मनसे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष आणि नेते गजानन काळे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

वाचा गजानन काळेंची पोस्ट जशीच्या तशी -

"२०१४ पासून २०१९ पर्यंत मोदींच्या आणि भाजपच्या - मांडीवर कडेवर बसून सत्तेची मौज लुटली… तेव्हा महाराष्ट्र द्रोही असल्याची लाज वाटली नाही का ??? आता राजसाहेब ठाकरेंनी , मनसेने महायुतीला पाठींबा दिला तर मनोरुग्ण राऊतांचा तिळपापड झाल्याचं दिसतय…तुमचे उद्धव ठाकरे त्या ‘औरंग्याची औलाद’ अबू आझमीला कडेवर घेऊन नाचत आहेत याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का ??? या महाराष्ट्र द्रोही अबू आझमी बरोबर युती केल्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकारांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील.???", अशी पोस्ट काळेंनी केली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना, "काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी, अशी महाराष्ट्राची स्थिती नाही. महाराष्ट्रात किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेले असताना, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन शीख, जैन, बौद्ध या देशातील सगळ्या जातीधर्माचे पंताचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत. मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. ज्या ठाकरे परिवाराने महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या संपूर्ण जीवनाचे समर्पन केले. मराठी माणसाला ताकद दिली. त्याच कुटुंबातील एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीने चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल, तर मला असे वाटते प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला असेल",अशी टीका राऊत यांनी राज ठाकरेंवर केली.

हिंदूंनी महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करा - राज ठाकरे

"हिंदूंनी महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करा, असा मी 'फतवा' काढतो", असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांची शुक्रवारी (दि. १० मे) पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे म्हणाले, "तुम्ही मुस्लीम समाजाला काय समजता, ती तुमच्या घरची गुरे-ढोरे आहेत. त्यांनाही समजते की, काय चालले आहे आणि कोण आपल्याला वापरून घेते. बघा, निवडणुकीच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत. काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा, मशिदीमधील मौलवी जर फतवे काढत असतील की, यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे फतवा काढतो, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भागिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील...भाजप, शिंदे आणि अजित पवारांचे जे उमेदवार असतील...त्यांना भरघोस मतदान करा," असे राज ठाकरे म्हणाले होते.

logo
marathi.freepressjournal.in