Pune : "खंडणी द्या नाहीतर..." मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

पुण्यातील (Pune) मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांचा मुलगा रूपेश मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे
Pune : "खंडणी द्या नाहीतर..." मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

पुण्यातील (Pune) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांचा मुलगा रुपेश मोरे यांना 'खंडणी द्या नाहीतर गोळी घालू' असा मेसेज पाठवण्यात आला आहे. यामुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच, मुस्लीम मुलीसोबतच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र व्हायरल करू अशी धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, अन्फिया शेख या मुली सोबत विवाह झाल्याचे बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र व्हायरल करू, अशी धमकी देत ३० लाख रुपयांची मागणी केली आहे. तसेच, बलात्काराचा गुन्हा दाखल करू, असेदेखील या मेसेजमध्ये लिहिले आहे. खंडणी दिली नाही तर, गोळी घालू अशा धमक्यांचा मेसेज त्यांना करण्यात आला आहे. पोलीस यूप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in