एसटी बसमध्ये आता आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक; प्रवाशांच्या तक्रारींचे होणार तातडीने निराकरण

एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक...
एसटी बसमध्ये आता आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक; प्रवाशांच्या तक्रारींचे होणार तातडीने निराकरण
Published on

मुंबई : एसटी प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करता येईल, अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. त्यानुसार एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामुळे प्रवाशांना आपली समस्या थेट मोबाईलवरून मांडता येणार आहे.

एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात. मात्र तक्रार नेमकी कुठे करावी, याबाबतची माहिती प्रवाशांना नसते. यापूर्वी एसटी बसेसमध्ये संबंधित आगाराचा व स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध करण्यात येत होता. मात्र, काही काळाने हे नंबर दिसेनासे झाले.

logo
marathi.freepressjournal.in