गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी 'मोदी एक्स्प्रेस'; ९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे धावणार

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांची ९ आणि ११ सप्टेंबरला 'मोदी एक्स्प्रेस' धावणार आहे. १४ वर्षांपासून गेल्या गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जाणाऱ्या या विशेष रेल्वेची या वर्षीची तयारी पूर्ण झाली आहे.
गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी 'मोदी एक्स्प्रेस'; ९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे धावणार
गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी 'मोदी एक्स्प्रेस'; ९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे धावणार
Published on

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांची ९ आणि ११ सप्टेंबरला 'मोदी एक्स्प्रेस' धावणार आहे. १४ वर्षांपासून गेल्या गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जाणाऱ्या या विशेष रेल्वेची या वर्षीची तयारी पूर्ण झाली आहे. ९ आणि ११ सप्टेंबरला दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी १०.३० वाजता 'मोदी एक्स्प्रेस' कोकणाच्या दिशेने रवाना होणार असल्याची घोषणा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.

गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात खाण्यापिण्याची इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. बुकिंगसाठी २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित भाजप मंडल अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन राणे यांनी केले. कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील चाकरमान्यांनी भाजप मंडलाध्यक्षांशी तर रत्नागिरी प्रवाशांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

चाकरमान्यांची हक्काची गाडी !

गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'मोदी एक्स्प्रेस'च्या माध्यमातून चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जात आहोत. दरवर्षी प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून मनापासून समाधान वाटते. यंदाही नाचत-गाजत आपल्या गावाकडे जाण्यासाठी 'मोदी एक्स्प्रेस' सज्ज आहे. आपली हक्काची मोदी एक्स्प्रेस पकडा आणि गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गावाकडे जाऊ या, असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in