मोदींचा शिर्डी दौऱ्या, मराठा समाज आक्रमक ; सभेसाठी नागरिकांना घ्यायला आलेल्या गाड्या पाठवल्या माघारी

अहमदनगर जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून गावागावत गावबंदी केली जात आहे.
मोदींचा शिर्डी दौऱ्या, मराठा समाज आक्रमक ; सभेसाठी नागरिकांना घ्यायला आलेल्या गाड्या पाठवल्या माघारी

राज्यात मराठा आंदोलनचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यासाठी नागरिकांना घेण्यात आलेल्या गाड्या परत पाठवण्यात आल्या आहेत. गावबंदी असल्यानं शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील मराठा समाजाच्या वतीन निर्णय घेण्याता आला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आवाहानानंतर मंत्री विखे पाटील यांच्या कुटुंबीयांविरोधात मठाचीवाडी येथील मराठा समाज आक्रमक झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील सभेसाठी जाणाऱ्सा बसेस शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव येथे अडवण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून गावागावत गावबंदी केली जात आहे.

आज मोदींचा शिर्डी दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीतील साई मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. दुपारच्या सुमासार पंतप्रधान शिर्डीच्या मंदिरात येणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते साई बाबांची पाद्यपूजा आणि आरती होईल. यावेली साई संस्थानच्या वतिने पंतप्रधान मोदींचा सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मंदिरात असताना अर्ध्या तास दर्शनासाठी रांग बंद करण्यात येणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी विविध प्रकल्पांचं लोकार्पण सोहळा होणार आहे. २०१८ नंतर आता पाच वर्षांनी मोदी हे शिर्डीत दौऱ्यावर आहेत.

logo
marathi.freepressjournal.in