संतोष आनंद यांना मोहम्मद रफी जीवन गौरव तर सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार  

आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे गेल्या १६ वर्षापासून मोहम्मद रफी यांच्या वाढदिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
संतोष आनंद यांना मोहम्मद रफी जीवन गौरव तर सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार

 

सत्तरीच्या दशकात आपल्या गीतांनी प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गीतकार संतोष आनंद यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार तर, तीन दशकांच्या कारकिर्दीत हिंदीसह अनेक भाषांमध्ये ५ हजारांहून अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या ख्यातनाम गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार २०२३ देण्यात येणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज(२४ डिसेंबर) याबाबतची घोषणा केली.

शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व  मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

यावर्षी गीतकार संतोष आनंद आणि गायक सोनू निगम यांना पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो आहे, असे सांगताना शेलार म्हणाले की, “कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारे आणि त्याकाळी नावाजलेले दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारे गीतकार संतोष आनंद यांचा प्रवास अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्यांना मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्काराने आणि उमदा गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. रफी साहेबांचा 99 वा. वाढदिवस असून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे या निमित्ताने या पुरस्काराचे एक वेगळे महत्त्व आहे.”

 वांद्रे पश्चिम  येथील रंगशारदा येथे आज (24 डिसेंबर)  या  पुरस्काराचा वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वाजता सुरू होणार आहे.  यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे "फिर रफी" या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत.

यापूर्वी अनेक दिग्गजांचा सन्मान

या पुरस्काराचे हे 17 वे वर्ष असून यापुर्वी संगीतकार आनंदजी,  गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले,  सुरेश वाडकर, शमशाद बेगम,  संगितकार रवी,  शैलेंद्र सिंग,  नौशाद अली,  पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम,  संगीतकार उषा खन्ना,  गायक उदित नारायण या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in