भारताला हिंदू राष्ट्र करणारच मोहन भागवत यांचा निर्धार

देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी माध्यमांनी समाजाला तयार केले पाहिजे
भारताला हिंदू राष्ट्र करणारच मोहन भागवत यांचा निर्धार

नागपूर : वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत, हे लोकांना समजले आहे तर काही लोक समजूनही समजून घेण्यास तयार नाहीत. हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे आणि ते आम्ही करणारच, असा निर्धार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले, ‘‘आज जे भारतात आहेत, त्या प्रत्येकाचा संबंध हिंदू संस्कृती, हिंदू पूर्वज आणि हिंदू भूमीशी आहे. इतर कोणाशी नाही. काही लोकांना हे समजलं आहे, काही लोक समजल्यानंतरही अनभिज्ञ राहतात, तर काही लोकांना समजूनही स्वार्थामुळे समजून घ्यायचं नाही. तर आपण हिंदू आहोत, हेच काही लोक विसरले आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की, आरएसएस हिंदूंची काळजी आहे. देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी माध्यमांनी समाजाला तयार केले पाहिजे, असेही भागवत म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘जनमत तयार करण्यात मीडियाने मोठी भूमिका घेतली आहे. यासाठी म्हणूनच चांगल्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. माध्यमांनी सामाजिक भान वाढवले पाहिजे.’’ नितीन गडकरी म्हणाले, ‘‘वृत्तपत्रे विचाराच्या आधारावर चालली पाहिजेत. ध्येय निश्चित केल्यानंतर काम करणं महत्त्वाचं आहे. सर्वसमावेशक विचारधारा ही वृत्तपत्रांची ओळख असायला हवी. जनतेलाही एका ठरावीक विचारधारेचे माध्यम आवडते.’’

logo
marathi.freepressjournal.in