युवतीचा विनयभंग; फलटण पोलिसांत गुन्हा

नोएडा स्थित कंपनीतील युवकाने विनयभंग केल्याने युवतीच्या तक्रारीवरून त्या युवकाविरुद्ध फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
युवतीचा विनयभंग; फलटण पोलिसांत गुन्हा
Published on

कराड : सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरातील २७ वर्षीय युवतीचा तिच्या नोएडा स्थित कंपनीतील युवकाने विनयभंग केल्याने युवतीच्या तक्रारीवरून त्या युवकाविरुद्ध फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकल्प जैस्वाल असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. तक्रारदार युवती नोएडा येथील एका कंपनीत काम करते; मात्र सदर काम ती घरातूनच 'वर्क फ्रॉम होम' तत्वावर करते. सदर काम करताना तिला व तिच्या कुटुंबीयांना नोएडा येथील संकल्प जैस्वाल नामक युवकाने फोनवरून धमकी देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. संकल्प जैस्वाल हा तिला सप्टेंबर २०२२ पासून ते १८ जाने. २०२४ पर्यंत सतत फोनवरुन धमकावत व मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तिला मानसिक त्रास देत होता. तो तिच्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी असून, तो युवतीच्या वैयक्तिक मोबाईलवर फोन करून व व्हॉट्स अपवर तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत होता. तसेच तिने त्याला लग्न ठरले आहे, मला त्रास देऊ नको असे सांगितले. तरीही त्याने फोनवरून तिच्या आई, वडील, नातेवाईकांना, भाऊ, चुलती यांनाही फोन करून तिची बदनामी केली; शिवीगाळ केली म्हणून तिने फलटण पोलिसात त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in