महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय ; हवामान खात्याने केली घोषणा

राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि जम्मू- काश्मीरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय
महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय ; हवामान खात्याने केली घोषणा

बऱ्याच दिवसांपासून मान्सूनची वाट बघतली जात होती. 'बिपरयजॉय' चक्रिवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला होता. आता राज्यात मान्सूनचं आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य सुखावला आहे. आता हवामान खात्याने एक मोठी घोषणा केली आहे. आज मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली. राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि जम्मू- काश्मीरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाला असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

आज मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील दोन दिवसात राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये देखील मान्सून सक्रिया होण्यासाठीचं अनुकूल वातारवण असल्याची माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे. राज्यातील काही भागात सध्या पावसाने तुफान हजेरी लावली असली तरी काही भागात अजून पावासाची प्रतिक्षा कायम आहे.

मुंबई आणि दिल्लीतसुद्धा मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा हमावान विभागाने केली. यावर्षी मुंबईत मान्सूनचे आगमन 14 दिवस उशिराने झालं आहे. तर दिल्लीत मात्र दोन दिवस आधीचं मान्सून दाखल झाला आहे. राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. काल मुंबईत पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळाला. या पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in