
राज्यात मान्सून अतिसक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागात अति मुसळधार पाऊस झाला असून काही भागात अजून सुरु आहे. पुढील तीन दिवस विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
राज्यात मान्सून अतिसक्रिया असल्यामुळे राज्यातील विविध भागात ढगांच्या गडघटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्यापासून २९ सप्टेंबरपर्यंत आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञानी दिली आहे.
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार २४ आणि २५ सप्टेंबर रोजी मान्सून सबड्युड असणार आहे. तर २६ सप्टेंबरनंतर उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या अरबी समुद्रावर एक सिस्टिम तयार होण्याची शक्यता आहे. त्या सिस्टीमच्या प्रभावाखाली २६ सप्टेंबर मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.