
कराड : पतीशी वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून भूषणगड (पंतवस्ती) (ता. खटाव) येथील ३० वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. सीमा रवींद्र येवले (३०), तन्वी रवींद्र येवले (३) अशी मृत मायलेकींची नावे आहेत.
सीमा येवले ही आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडली. भूषणगडच्या पंतवस्तीमधील घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत तिने मुलीसह उडी घेऊन आत्महत्या केली.
मात्र हा प्रकार कोणाच्याच लवकर लक्षात आले नाही. सायंकाळी या दोघींचा शोध सुरू केला असता काही वेळानंतर नागरिकांच्या निदर्शनास सदर विहिरीजवळ काही साहित्य आढळून आले त्यावरून आत्महत्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या घटनेची माहिती औंध पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
Satara Tragedy
Mother-Daughter Suicide
Domestic Dispute
Family Conflict
Mental Health Awareness
Aundh Police Investigation
Well Suicide Maharashtra
Rural Maharashtra News
Khatao Taluka News