पोलादपूरमध्ये मोटार पंपाची केबल चोरण्याचे सत्र सुरूच

सडवली ग्रामस्थांकडूनही पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याने या घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलादपूरमध्ये मोटार पंपाची केबल चोरण्याचे सत्र सुरूच

पोलादपूर : दोन वर्षांपूर्वी पोलादपूर शहरातील सावंतकोंड पार्टेकोंडदरम्यानचा लोखंडी पूल आणि त्यानंतर नळयोजनेची पाइपलाईन चोरीस गेल्याच्या घटना झाल्यानंतर यंदा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मोटार पंपाची विद्युतवाहक केबल चोरण्याचे सत्र सुरू झाल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये ग्रामस्थांच्या तक्रारी लेखी स्वरूपामध्ये आल्याने उघडकीस आले आहे. सडवली ग्रामस्थांकडूनही पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याने या घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलादपूर तालुक्यातील लोहारे आणि दिविल येथे फार्महाऊसपर्यंत नदीतील मोटारपंपापासून नेण्यात आलेली विद्युतवाहक तार चोरण्याच्या घटनांनंतर पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी येथील दळवी फार्महाऊसच्या मागील भागात महाड येथील सेवानिवृत्त बँककर्मचारी विनायक खोडके यांच्या फळबागेतील विद्युतवाहक वायर दोन वेळा अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची तक्रार पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्याकडे विनायक खोडके यांनी लेखी स्वरूपात दिली. यानंतर याप्रकरणी तळा तालुक्यातील मोटारपंपापासून नेण्यात आलेली विद्युतवाहक तार चोरणाऱ्यांना अधिक तपासासाठी पोलादपूर येथे आणण्याची तयारी सुरू असताना पोलादपूरनजिकच्या सडवली ग्रामस्थांकडूनही चोळई डोहातील मोटारपंपापासून सडवली गावाच्या पंपहाऊसपर्यंत ५० मीटर लांबीची अंदाजे १५ हजार रूपये किंमतीची विद्युतवाहक केबल ८ डिसेंबर रोजी चोरीला गेल्याची तक्रार पोलादपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्जाद्वारे तक्रार देण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in