हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सामंजस्य करार

या समारंभास सिम्बाॅयसिसमधील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सामंजस्य करार

हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्याचे आपले सामाजिक दायित्व जपण्यासाठी सिम्बाॅयसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने (एसएसपीयू) एनर्जी स्वराज्य फाउंडेशन बरोबर संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. असे एनर्जी स्वराज्य फाउंडेशन बरोबर करार करणारी एसएसपीयु ही भारतातील पहिलीच युनिव्हर्सिटी ठरली आहे.

या समारंभास सिम्बाॅयसिसमधील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या समारंभाची सुरुवात डॉ. गौरी शिरूरकर (प्रभारी कुलगुरु, एसएसपीयू) यांच्या स्वागतपर भाषणाने झाली आहे. तसेच डॉ. स्वाती मुजुमदार (प्र-कुलपती सिम्बाॅयसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ) यांनी कौशल्य आणि कौशल्यशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

या संयुक्त सामंजस्य करारामध्ये सिम्बाॅयसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि एनर्जी स्वराज फाउंडेशन यांनी जगावरील हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पुढील उपक्रम राबविण्यास संयुक्तपणे सहमती दर्शवली आहे.

ऊर्जा साक्षरता, ऊर्जेचा वापर कमी करणे, ऊर्जा साक्षरतेचे महत्त्व आणि मानवी समाजावर हवामान बदलाचा प्रभाव याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सिम्बाॅयसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीद्वारे ऊर्जा स्वराज यात्रा आयोजित करणे, ऊर्जा वापर कमी करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. तसेच हवामान बदलाच्या परिणामांबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करेल.

ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी प्रत्येकाला या कार्यक्रमात सहभागी करून घेणे आणि विद्यार्थी, शिक्षकांना एक वर्ग खोली १०० टक्के सौरऊर्जेवर सुरू करण्याचे मिशन दिले जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in