खासदार भावना गवळींची प्रतोद पदावरून उचलबांगडी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले होते.
खासदार भावना गवळींची प्रतोद पदावरून उचलबांगडी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील विधिमंडळात धक्का बसल्यानंतर आता शिवसेनेकडून संसदीय राजकारणाच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी (Bhavana Gawali) यांची उचलबांगडी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा सातत्याने रंगली आहे. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून दूर केले आहे. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in