मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून संभाजीराजेंनी बोलावली दिल्लीत खासदारांची बैठक; कोणते खासदार राहणार उपस्थित?

कोणकोणते खासदार संभाजीराजे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून संभाजीराजेंनी बोलावली दिल्लीत खासदारांची बैठक; कोणते खासदार राहणार उपस्थित?
PM

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षाणावरून राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

18 डिसेंबरला महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या या बैठकीस संभाजीराजे यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना निमंत्रन देण्यात आले आहे. मात्र, या बैठकीला शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले आणि सुप्रिया सुळे यांच्यासारखे बडे खासदार उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व खासदार हे दिल्लीत उपस्थित आहेत. आता यामधील कोणकोणते खासदार संभाजीराजे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षणावर ठाम आहेत. तर, सरकार स्वतंत्र आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जातं आहे. त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेईल या गोष्टीकडे सगळयांचे लक्ष लागून आहे. खरोखरच 24 तारखेपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल का? यावर प्रश्नचिन्ह आहे. तसेच 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार आणि खरंच मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in