ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट ; नव्या संसदेत पक्ष कार्यालय देण्याची मागणी

यापूर्वी देखील ठाकरे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून नव्या संसदेत पक्ष कार्यालय देण्याची मागणी केली होती
ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट ; नव्या संसदेत पक्ष कार्यालय देण्याची मागणी

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड करत भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या पक्षावरच आपला दावा सांगितला. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं. यानंतर शिवसेनेचं संसदेतील कार्यलया देखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात होतं. आता मात्र ठाकरे गटाला नव्या संसद भवनात कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. यासाठी आज ठाकरे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे.

एकनाथ शिंदे यांनी पक्ष ताब्यात घेतल्यानंर उद्धव ठाकरे गटाचं अस्तित्व आणि भविष्यावर अनेक प्रश्न उभे रहीले. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून संसदेतील पक्ष कार्यालय देखील काढून घेण्यात आलं. आता त्यांना नव्या संसदेत कार्यलय मिळण्याची शक्यता आहे. यासाठी ठाकरे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे. यापूर्वी देखील ठाकरे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नव्या संसदेत पक्ष कार्यालय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदारांनी आता थेट भेटचं घेतली.

लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर खासदारांनी नव्या संसदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कार्यलया देण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ते नेमका काय निर्णय घेतात, ठाकरे गटाला नव्या संसदेत कार्यलय मिळतं का नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in