MPSC ७५८ रिक्त पदे भरणार; 'गट ब'साठी अधिसूचना जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती २०२६ ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ७५८ रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
MPSC ७५८ रिक्त पदे भरणार; 'गट ब'साठी अधिसूचना जाहीर
MPSC ७५८ रिक्त पदे भरणार; 'गट ब'साठी अधिसूचना जाहीर
Published on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती २०२६ ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ७५८ रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल २०२६ पर्यंत देण्यात आली आहे.

या भरती मोहिमेंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी-३ पदे, राज्य कर निरीक्षक-२७९ पदे, पोलीस उपनिरीक्षक-३९२ पदे, तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक या गट-ब-८४ पदांचा समावेश आहे. विविध विभागांतील ही पदे प्रशासन, महसूल आणि पोलिस यंत्रणेत महत्त्वाची मानली जातात. शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असून, साधारणपणे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. काही पदांसाठी विशिष्ट शारीरिक पात्रताही लागू असू शकते. विशेषत: पोलीस उपनिरीक्षक पदासाठी. तसेच उमेदवारांचे वय, आरक्षण- निहाय सवलती आणि इतर अटी आयोगाच्या अधिसूचनेनुसार लागू राहतील. खुला प्रवर्गातील उमेदवारांना ५४४ ऊपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ३४४ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. या भरती प्रक्रियेत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा टप्प्यांद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या भरतीकडे राज्यातील हजारो उमेदवारांच्या नजरा होत्या. त्यामुळे इच्छुकांनी वेळेवर अर्ज करून परीक्षेची तयारी सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in