MPSC परीक्षेत विजय लामकाने व आरती जाधव प्रथम

एमपीएससी राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२४चा अंतिम निकाल जाहीर झाला असून यंदा विजय लामकाने यांनी राज्यात अव्वल क्रमांक पटकावला, तर आरती जाधव महिला गटात प्रथम आल्या आहेत.
MPSC परीक्षेत विजय लामकाने व आरती जाधव प्रथम
Published on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२४चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या निकालानुसार विविध २० संवर्गातील एकूण ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने (६२४ गुण) यांनी सर्वसाधारण व इतर मागासवर्ग गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातीलच आरती परमेश्वर जाधव (६०१ गुण) या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत. विजय लामकाने हे मोहोळ तालुक्यातील कोऱ्हेरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी असून, आरती या दक्षिण सोलापूरमधील हिपळे गावच्या आहेत.

दरम्यान, परीक्षेचा सविस्तर निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून प्रत्येक प्रवर्गासाठीचे सीमांकन (कट-ऑफ) गुणही जाहीर करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच हा निकाल न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांची शिफारस ही सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणीच्या अधीन राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in