
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम हा २०२५पासून लागू होणार असल्याचे जाहीर रण्यात आले आहे. यासंदर्भात ट्विट करून माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे." त्यामुळे आता एमपीएससी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.