Maharashtra Board Result 2023 : रिझल्ट आला रे... राज्याचा बारावीचा निकाल ९१.३५ टक्के

उत्तीर्ण मुलांचे प्रमाण ८९.१४ टक्के आहे. म्हणजे मुलांपेक्षा पाच टक्के जास्त मुली या परीक्षेत उत्तीर्ण
Maharashtra Board Result 2023 : रिझल्ट आला रे...  राज्याचा बारावीचा निकाल ९१.३५ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२वीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा बारावीचा निकाल ९१.३५ टक्के लागला आहे. दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा ९३. ७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलांचे प्रमाण ८९.१४ टक्के आहे. म्हणजे मुलांपेक्षा पाच टक्के जास्त मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा यंदा ऑफलाइन घेण्यात आली. विभागनिहाय निकालाच्या टक्केवारीत कोकण विभाग अव्वल तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के तर मुंबईचा निकाल 88.13 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.

राज्यात एकूण 14,16,371 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in