ठाणे हादरले...किरकोळ वादातून प्रेयसीला कारखाली चिरडले, MSRDCच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाची मुजोरी

पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास ओवळा येथील कोर्टयार्ड हॉटेलजवळ भेटायला बोलावले आणि...
ठाणे हादरले...किरकोळ वादातून प्रेयसीला कारखाली चिरडले, MSRDCच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाची मुजोरी

ठाण्यातून एक धक्कादाक घटना समोर आली आहे.एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकच्या मुलाने प्रेयसीसोबत झालेल्या वादातून तिच्या अंगावर कार घालून चिरडत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रिया सिंग असं जखमी तरुणीचं नाव असून अश्वजीत गायकवाड असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ओवळा भागात ही घटना घडली. अश्वजीतने त्यांच्या मित्रांच्या मदतीने हा हल्ला केल्याचा आरोप प्रियाने केला आहे. सध्या तिच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अश्वजीतसह तीन जणांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिया सिंग ही उच्चशिक्षित तरुणी घोडबंदर येथे राहते. अश्वजीत गायकवाड याने तिला सोमवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास ओवळा येथील कोर्टयार्ड हॉटेलजवळ भेटायला बोलावले. तेथे त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. यानंतर अश्वजितने प्रियाला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच तिच्या डाव्या हाताला चावाही घेतला. त्यानंतर अश्वजितने त्याच्या मित्रांना तिला कारने उडवून टाका असं सांगताच त्याचे मित्र रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी प्रियाच्या अंगावर कार घालून तिला चिरडले. या घटनेत प्रिया गंभीर जखमी झाली आहे. तिने इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावरून प्रियकर अश्वजीत गायकवाडने जीवघेणा हल्ला केल्याची पोस्ट केली. यानंतर ही घटना उघडकीस आली.

तीन दिवसांनंतरही आरोपी मोकाट; पोलिसांवर कोणाचा दबाव?

कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरही आरोपी अश्वजीत गायकवाड, रोमील पाटील आणि सागर शेळके हे मोकाट फिरत आहेत. त्यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही. अश्वजीत गायकवाडची ठाण्यातील अनेक प्रमुख नेत्यांशी राजकीय जवळीक असल्याने आणि तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या एमएसआरडीसी खात्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र असल्याने ठाणे पोलीस दबावाखाली कारवाई करत नाहीत काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in