आजच होणार एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार; इतक्या कोटींचे झाले वितरण

एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड जाणार असून राज्य शासनाने रखडलेल्या पगाराबाबत मोठी घोषणा केली आहे
आजच होणार एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार; इतक्या कोटींचे झाले वितरण
Published on

एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड जाणार आहे. कारण, राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत मोठा निर्णय घेतला. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे, आजच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतीत एक परिपत्रक काढत याबद्दल माहिती दिली. तत्पूर्वी, याही महिन्यामध्ये पगार आला नसल्याने १४ जानेवारीला एसटी कर्मचारी आंदोलन करण्याच्या तयारीत होते. मात्र, राज्य शासनाने परिपत्रक काढून त्यांना दिलासा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, या निधीतून त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार असून ग्रॅज्युइटी, पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रणित एसटी संघटनेचे म्हणणे आहे की दिलेली रक्कम ही अपुरी आहे. एसटी संप काळात राज्य सरकारने न्यायालयात आश्वासन दिले होते की, कर्मचाऱ्यांचे पगार हे ७ ते १० तारखेदरम्यान होतील. मात्र, तरीही वेळेवर पगार होत नसल्याने कर्मचारी संतप्त झाले होते. अखेर परिपत्रक काढून एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला.

logo
marathi.freepressjournal.in