एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन
एक्स @PratapSarnaik
Published on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले.

एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन आयुक्त विवेक भीमनराव एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन. परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही, याची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन मंत्री त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले.

मंत्री सरनाईक म्हणाले, भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवासी जनतेला दर्जेदार सेवा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ व निर्जंतुक असतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसस्थानकावर व नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे, या वर भर देणार आहोत.

logo
marathi.freepressjournal.in