एसटी महामंडळाच्या इंधन सवलतीत ३० पैशांची वाढ, ११.८ कोटींची होणार बचत; तेल कंपन्यांचा निर्णय

दररोज सुमारे ३.२३ लाख रुपयांची आणि वार्षिक ११.८ कोटी रुपयांची बचत होणार...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएएनआय
Published on

मुंबई : तोट्यात चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास दिली जाणारी इंधन सवलत १ ऑगस्टपासून वाढवण्याचा निर्णय राज्याच्या मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे १२ कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे.

“इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांनी परिवहन मंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेलवरील सवलत प्रति लिटर ३० पैशांनी वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे दररोज सुमारे ३.२३ लाख रुपयांची आणि वार्षिक ११.८ कोटी रुपयांची बचत होईल,” असे महामंडळाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महामंडळाकडे १५,००० हून अधिक बस असून, राज्यभरातील २५१ डेपोमध्ये दररोज सुमारे १०.७७ लाख लिटर डिझेल खरेदी केले जाते.

"महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे खर्च कमी करणे आणि तिकीट विक्रीपलीकडे इतर उत्पन्नाचे पर्याय शोधणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून महामंडळ अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल." - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

logo
marathi.freepressjournal.in